"भारत-इराण व्यापार धोक्यात..इराण कडून काय काय खरीदी करतो भारत जाणून घ्या

13 Jan 2026 10:08:54

नवी दिल्ली,
india iran trade व्हेनेझुएलावर हल्ल्यानंतर इराण आता अमेरिकेच्या लक्षात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर तात्काळ २५% अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिली आहे. या निर्णयामुळे भारत, चीन, संयुक्त अरब अमिरातीसह इराणचे काही मुख्य व्यापारी भागीदार आर्थिक दबावाखाली येऊ शकतात.
 

इराण निर्यात  
 
 
अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, भारत-इराण व्यापार २०२४-२५ मध्ये १.६८ अब्ज डॉलर्स (१५,१५८ कोटी रुपये) इतका होता. यापैकी भारताने १.२४ अब्ज डॉलर्स (११,१८८ कोटी रुपये) मूल्याच्या वस्तू इराणला निर्यात केल्या, तर ०.४४ अब्ज डॉलर्स (३,९७० कोटी रुपये) मूल्याच्या वस्तू इराणमधून आयात केल्या.india iran trade
 
भारताची मुख्य निर्यात:
तांदूळ, चहा, साखर, औषधे, कृत्रिम दागिने, विद्युत यंत्रसामग्री, मानवनिर्मित स्टेपल फायबर.
 
भारताची मुख्य आयात:
सुकामेवा, सेंद्रिय रसायने, काचेच्या वस्तू.
 
विशेष म्हणजे, रशियाकडून तेल खरेदीवर आधीच भारतावर ५०% कर लागू आहे. जर इराणमधून होणाऱ्या आयातीवरही २५% कर लागू झाला, तर भारताला एकूण ७५% कराचा ताण सहन करावा लागू शकतो.

Powered By Sangraha 9.0