अनिल कांबळे
नागपूर,
IT engineer defrauded एका आयटी अभियंत्याची तब्बल 50 लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये माेठा ना मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी ही फसवणूक केली. अभियंत्याच्या तक्रारीवरून सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरातील एक आयटी अभियंता 25 डिसेंबर 2025 राेजी फेसबुक बघत हाेते. याच दरम्यान शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीद्वारे माेठा ना मिळण्यासंबंधी जाहिरात दिसली. कुतूहलापाेटी त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर व्हाॅट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
सायबर गुन्हेगारांनी याेजनाबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यास सुरुवात केली. पीडित अभियंत्याला एका व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले, जिथे सतत शेअर ट्रेडिंगमधून माेठा ना झाल्याचे स्क्रीनशाॅट पाठवले जात हाेते. अनेक जणांनी ना कमावल्याचे दावे आणि वाढलेल्या रकमेचे पुरावे दाखवण्यात आल्याने अभियंत्याचा विश्वास बसला. त्यानंतर आराेपींनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सांगून विविध खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पाहता पाहता पीडिताकडून सुमारे 50 लाख रुपये उकळण्यात आले.
फसवणूक झाल्याचे आले लक्षात
काही दिवसांनंतर अभियंत्याने गुंतवणुकीची रक्कम परत मागण्यास सुरुवात केली असता आराेपींनी संपर्क ताेडला. त्यांना व्हाॅट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले आणि काही वेळातच ताे ग्रुपही बंद करण्यात आला. यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे अभियंत्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नाेंदवली. प्राथमिक कारवाईत पीडिताच्या खात्यातून गेलेल्या रकमेपैकी सुमारे 9 लाख रुपये वेळेत ्रीझ करण्यात पाेलिसांना यश आले.
3500 खात्यांत पाठवली रक्कम
आयटी अभियंत्याच्या खात्यातून ऑनलाइन पाठवलेली रक्कम सुमारे 3500 वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली हाेती. ही रक्कम प्रामुख्याने ऑनलाइन गेमिंगसाठी वापरण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा सायबर गुन्हेगारांचा नवा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगण्यात येते. तपासात बहुतेक रक्कम राजस्थान व गुजरातमधील ऑनलाइन गेमिंग प्लॅटफफाॅर्मद्वारे वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे.