मार्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम उद्यापासून

13 Jan 2026 22:00:11
तीन लाखांची बक्षिसे

मारेगाव, 
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे 15 जानेवारीपासून न्यू फ्रेंड्स क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य Kabaddi competition कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिप शाळेच्या मैदानावर ओपन पुरुष गट, 60 किलो आतील पुरुष गट, व महिला खुला गट यांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. पुरुषांच्या ओपन गटाचे प्रथम बक्षीस चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्र खासदार प्रतिभा धानोरकर यांचेकडून 51 हजार रुपये, द्वितीय बक्षीस मारोतराव गौरकार, गौरव आसेकर, रायल सय्यद मारेगाव यांच्याकडून 31 हजार, तृतीय बक्षीस मंगेश हरणे नागपूर यांचेकडून 21 हजार रुपये, चतुर्थ बक्षीस रवी धानोरकर संचालक वसंत जिनींग यांच्याकडून 11 हजार रुपये.
 
 
kabaddi
 
Kabaddi competition 60 किलो आतील पुरुष गटात प्रथम पुरस्कार अरविंद ठाकरे सरपंच ग्रापं कुंभा यांच्याकडून 41 हजार रुपये, द्वितीय बक्षीस गौरीशंकर खुराणा सभापती कृऊबा समिती मारेगाव यांच्याकडून 31 हजार, तृतीय बक्षीस अंकुश माफूर व आकाश बदकी यांच्याकडून 21 हजार, चतुर्थ बक्षीस मयुर ठाकरे कुंभा यांच्याकडून 11 हजार रुपये राहणार आहे. तर महिला गटात प्रथम पुरस्कार माजी खेळाडू हबीबखा जमालखा पठाण नागपूर यांच्याकडून 31 हजार रुपये, द्वितीय बक्षीस सारंग ठाकरे वरोरा यांच्याकडून 21 हजार, तृतीय बक्षीस डॉ. राजू देशपांडे, वणी यांच्याकडून 15 हजार, चतुर्थ बक्षीस सुरेंद्र काकडे चनोडा यांच्याकडून 11 हजार रुपये राहणार आहे.
 
 
 
तसेच तीनही गटातील विजेत्यांना सुरेश चांगले, सुरेश मुरस्कर, अनंता जुमळे यांच्याकडून चषक दिली जाणार आहेत. बाळू थेरे यांच्यातर्फे न्यू फ्रेंड्स क्रिडा मंडळ मार्डी यांना कबड्डी किट, तर बेस्ट रेडर अयुबखाँ पठाण, बेस्ट डिफेंडर अखिलेश कांबळे, बेस्ट ऑलराऊंडर राजकुमार बोबडे यांचेकडून तीनही गटातील उत्कृष्ट खेळाडूंना चषक प्रदान केली जाणार आहेत. सुरेश नाखले व अतुल बोबडे यांच्याकडून तीनही गटातील बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट ऑलराऊंडर यांना गिफ्ट हॅम्पर तर बेस्ट प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटला होमथियटर दिला जाणार आहेत.
 
 
तीनही गटातील Kabaddi competition कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दि मॅचला समीर कुळमेथे, शाहरुख शेख, राहील पठाण, नयन आसुटकर, रोशन हरबडे यांच्याकडून सायकल भेट दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाèया संघांनी अध्यक्ष अक्षय सराटे (8390895042), सचिव समाधान सिरामे (9022699623) यांच्याशी संपर्क साधून आपल्या संघाची नोंदणी करावी, असे आवाहन न्यू फ्रेंडस क्रीडा मंडळ मार्डीच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0