लाखनीत बॅगमध्ये सापडलं नवजात बाळ

13 Jan 2026 20:31:48
भंडारा,
newborn-baby-found : लाखनी पोलिस ठाण्यांतर्गत पिंपळगाव सडक येथील शेतजमिनीला लागून एका बॅगमध्ये नवजात शिशु आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज दि.१३ रोजी उघडकीस आली.
 
 

LAKHNI 
 
 
 
मानेगाव सडक येथील शेतजमिनीला लागून असलेल्या झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ८ ते १० दिवसांचे नवजात बाळ सापडले. या माहितीवरुन लाखनीचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे घटनास्थळी पोहोचले. बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये एक स्त्री जातीचे नवजात बाळ दिसले. त्या बाळाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0