लाखनी
lakhani-blood-donation : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज, श्रीक्षेत्र नानिजधाम संस्थानामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची परंपरा यंदाही जोमात कायम ठेवत लाखनी तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. देहदान, नेत्रदान, अवयवदान, कच्चे बंधारे बांधणे तसेच दरवर्षी नियमितपणे घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या परंपरेतून संस्थान समाजहिताचा वसा जपताना दिसून येत आहे. आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडवले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई पोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी स्त्रीरोगतज्ञ डॉ. मनोज आगलावे, डॉ. चंद्रकांत निंबरते, डॉ. मिलिंद भुते, डॉ. बंडू चौधरी, गिरीश बावनकुळे, मुरमाडीचे सरपंच शेषराव धोंडूजी वंजारी, नगरसेवक संदीप भांडारकर, महेश आकरे, अश्विन धर्मसारे, प्रा. अजिंक्य भांडारकर, प्रा. मेश्राम, अशोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शासकीय जिल्हा रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सौरभ गोस्वामी, रक्तपेढीचे पी.आर.ओ. राजेंद्र नागदेवे यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. रामानंदाचार्य संप्रदायाकडून मुन्नालालजी मोटघरे (छत्तीसगड पीठ सहायक), संतोष भाऊ भुरे (जिल्हा पीठ निरीक्षक), आशिष बालपांडे (जिल्हा युवा अध्यक्ष), नितेश वंजारी (जिल्हा सेवा अध्यक्ष), वर्षाताई राजू फंदे (जिल्हा महिला सेवा अध्यक्ष), विष्णुदासजी तळवेकर (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), प्रशांतजी कुरंजेकर (जिल्हा ब्लड युनिट प्रमुख), चंद्रशेखर कुंभरे (तालुका सेवा अध्यक्ष), श्रावण कोठेकर (तालुका कार्यवाह), अर्चना विष्णुजी तळवेकर, माधुरी हजारे (तालुका महिला सेवा अध्यक्ष) यांच्यासह संपूर्ण जिल्हा व तालुका समिती तसेच तालुक्यातील सर्व सेवा केंद्रांचे अध्यक्ष, गुरुबंधू व गुरुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश साठवणे, शिवानी फंदे, आयुष गायधने, पियुष तळवेकर, अंशुल फंदे, निलेश भोयर, अनमोल खंडाईत, आशिष भस्मे, मोहित फंदे यांनी परिश्रम घेतले. “सेवा हेच साधना” या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमामुळे लाखनी तालुक्यात सामाजिक कार्याला नवा आयाम मिळाला असून जगद्गुरु रामानंदाचार्य संस्थानाची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.