दिग्रस :
दिवसेंदिवस मांजामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालयाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामध्ये उत्पादन, विक्री आणि वापर यावर बंदी घातली आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यामुळे Manja sale मांजा विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे आवाहन दिग्रस पोलिस ठाण्याचे ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी मंगळवार, 13 जानेवारीला शहरातील प्रमुख चौकातून केले आहे.
Manja sale ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी सकाळ पासूनच मांजा विक्री करणाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून याबाबत खडसावून सुचना दिल्या. शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे मांजा विक्री करणे अथवा बाळगणे हा गुन्हा असल्याचे सांगीतले. तर वाल्मिक नगरातील एका मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. शाळेतील मुलांनाही नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास अनेक पक्षी घायाळ होऊन मरतात, असे सांगितले. तर एखाद वेळी पतंग कटल्यावर ती नेमकी कुठे पडेल हे सांगता येत नाही अशात पतंग दुचाकी चालविणाऱ्यांचा गळा कापू शकतो इतका हा जिवघेणा मांजा असल्याचे सांगितले.
Manja sale त्यामुळे पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरल्यास थेट 25 हजार रुपयांचा दंड देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे. अल्पवयीन मुलाकडे मांजा आढळल्यास पालकांना दंड होणार आहे. तर वयस्क व्यक्तीकडे मांजा आढळल्यास त्यालाच दंड भरावा लागणार असल्याचे ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी सांगितले. यासंदर्भा दिवसभर मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली आहे.