अनिल कांबळे
नागपूर,
municipal-corporation-election : महापालिका निवडणुकीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि काेणतेही गालबाेट लागू नये म्हणून शहर पाेलिसांनी कंबर कसली आहे. शहरात जवळपास सात हजार पाेलिसांचा चाेख पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला असून शहर पाेलिसांच्या मदतीला इतर जिल्ह्यातील देखील पाेलिस बंदाेबस्त मागविण्यात आला आहे.
15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. त्यानंतर लगेच दुसèयाच दिवशी मतमाेजणी हाेणार आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची हाेणार आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करीत आहेत. त्यासाठी ते प्रचारासह अन्य गैरमार्गाचा वापर हाेण्याची शक्यता आहे. त्यात अनुचित घटना हाेण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदाेबस्तात 489 पाेलिस अधिकारी, पाेलिस हवालदार आणि अंमलदार 2967, महिला शिपाई 1080 असा 4047 अधिकारी शिपायांना तैनात करण्यात आले आहे.
याशिवाय बाहेरील जिल्ह्यातून देखील पाेलिस बंदाेबस्त मागविण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर ग्रामीण येथून 248 शिपाई आणि 102 महिला शिपाई, वर्धा 80 शिपाई, 20 महिला शिपाई, अमरावती ग्रामीण 125 शिपाई, 35 महिला शिपाई, बुलढाणा 249 शिपाई, 11 महिला शिपाई, एचएसपी नागपूर येथून 17 शिपाई, 13 महिला शिपाई, नागपूर पाेलिस प्रशिक्षण केंद्रातून 521 महिला प्रशिक्षणार्थी शिपाई आणि नाशिक येथील महाराष्ट्र पाेलिस अकादमी येथून 32 अधिकारी बंदाेबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत. याशिवाय आरसीबी आणि क्युआरटी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.