पारवा,
घाटंजी तालुक्यातील Parwa Police पारवा पोलिस ठाण्यात सोमवारी ‘रेझिंग डे सप्ताह’ अनुषंगाने बाबासाहेब देशमुख विद्यालय, पारवा येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात आमंत्रित करून पोलिस विभागाचे दैनंदिन कामकाज व जबाबदाèया यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
Parwa Police यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात होणारे कामकाज, नागरिकांच्या तक्रारी कशा नोंदवल्या जातात, तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाèया डायल 112 सेवेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पोलिसांकडील शस्त्रांची माहिती देत त्यांच्या वापराचे नियम व सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. समाज माध्यमाचा सुरक्षित वापर, आभासी फसवणूक, सायबर बुलिंग याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम, महिला संबंधित गुन्हे आणि बालकांवरील गुन्हे याबाबत कायदे, प्रतिबंधात्मक उपाय व तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
Parwa Police या कार्यक्रमाला सहायक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायद्याचे पालन, शिस्त आणि समाजात जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे महत्त्व पटवून दिले. बाळासाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक चौलमवार, नार्लावार तसेच पोलिस जमादार बन्सोड तसेच विद्यालयातील विद्यार्थी आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेबाबतची जाणीव वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.