पुलगाव,
deepak-ahuja : स्थानिक नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसचे दीपक आहुजा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे दीपक आहुजा व भाजपतर्फे दुर्गेश यादव यांनी नामांकन दाखल केले होते. निवडणुकीत दुर्गेश यादव यांना ८ तर दीपक आहुजा यांना १४ मते मिळाली. त्यामुळे आहुजा यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांनी उपाध्यक्षाचे अभिनंदन केले. नगरपालिकेत काँग्रेस १२, भाजप आठ व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपतर्फे शरद सावरकर तर काँग्रेस तर्फे रवी केशरवाणी यांची वर्णी लागली.