रवी बेलूरकर यांची वणी नप स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती

13 Jan 2026 21:43:45
वणी, 
हिंदुत्वाच्या विचारधारेशी मागील तीन दशकांपासून निष्ठेने जोडलेले, संघटनात्मक ताकद आणि राजकीय अनुभवाचा भक्कम पाया असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते Ravi Belurkar रवी बेलूरकर यांची भारतीय जनता पार्टीने वणी नगर परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे भाजपा कार्यकर्ते, समर्थक व संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
Ravi Belurkar
 
Ravi Belurkar  रवी बेलूरकर हे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष, तसेच दुर्गा माता नवशक्ती मंदिर, आंबेडकर चौक येथील अध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते हिंदुत्ववादी चळवळीशी जोडल्या गेले असून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अभाविपमध्ये पूर्णकालिक कार्यकर्ता म्हणून केली आहे.
 
 
विशेष बाब म्हणजे, 2002 मध्ये अत्यंत तरुण वयातच भाजपाने त्यांच्यावर वणी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा शहराध्यक्ष म्हणून पक्षसंघटन मजबूत केले. सध्या ते यवतमाळ जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष असून वणी नपच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून निर्णायक भूमिका बजावली. या नियुक्तीमुळे भाजपामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0