दंत रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काम बंद

13 Jan 2026 10:41:11
नागपूर,
dental hospital मागील 3 महिन्यांंपासून विद्यावेतन न मिळाल्याने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे तीन वर्षांचे एकूण 72 निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यांना दरमहा 70 हजार रुपये विद्या वेतन मिळत असते. या रकमेेतून त्यांनना दैनंदिन खर्च, वैद्यकीय साहित्य आदी खर्च वहन करावा लागतो. ऑक्टोबर महिन्यापासून त्यांना विद्या वेतन मिळालेले नाही.
 
 

डेंटल  
 
 
या महिन्यात मिळेल, पुढील महिन्यात मिळेल असे म्हणता म्हणता त्यांना तीन महिन्यांपासून विद्या वेतन मिळाले नाही. वेतनच मिळत नसल्याने त्यांचे हाल सुरू झाले. आज सोमवारपासून त्यांना कामबंद आंदोलन पुकारले. त्यांनी आधी अधिष्ठात्यांच्या कक्षापुढे ठाण मांडले. त्यांची अधिष्ठात्यांनी समजूत घातली. दरम्यान, याबाबत अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांनी सांगितले की, 3 महिन्यांपासून विद्या वेतन मिळालेले नाही. दर महिन्यास वैद्यकीय शिक्षण विभागाकडे विद्या वेतनाचा पाठपुरावा केली जात आहे. नागपूरची फाईल मुंबईत वित्त विभागात अडकली असल्याचे सांगण्यात आले.dental hospital आधीची व आताच्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने कदाचित फाईलीवर निर्णय झालेला नसावा. पुढील आठवड्यात विद्या वेतन मिळू शकते.
Powered By Sangraha 9.0