विदर्भातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गावरील 18 फूट उंच

13 Jan 2026 11:33:05
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
swami vivekananda memorial देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, गोधणी बायपास, यवतमाळ येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून विदर्भातील राष्ट्रीय महामार्गावरील पहिले, 18 फूट उंच भव्य स्वामी विवेकानंद स्मारक अत्यंत भक्तीभावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात उद्घाटन समारंभाद्वारे अनावरण करण्यात आले.
 
 

vivekanand 
 
 
या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन स्वामी विष्णूपादानंदजी महाराज (प्रमुख, रामकृष्ण मिशन, छत्रपती संभाजीनगर) यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी स्वामी ओंकारेषानंद महाराज (नागपूर), स्वामी चेतनात्मानंद महाराज (गोंदिया) तसेच डॉ. संदीप राठोड (डायरेक्टर, क्रीडा व युवा मंत्रालय, भारत सरकार), जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना, डॉ. टीसी राठोड, एलएच पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यास जिल्ह्यातील हजारो नागरिक, युवक, विद्यार्थी व विवेकानंद प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मारक उभारणीत मोलाचे योगदान देणाèया देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये धनंजय तांबेकर, विवेक किनकर, राजू निवल, नगर परिषद उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद बावीस्कर व मंगला माळवी यांनी केले.swami vivekananda memorial या संपूर्ण स्मारकउभारणी व उद्घाटन सोहळ्यास ‘मेरा युवा भारत’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत अनिल ढेंगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेची संपूर्ण टीम, स्वामी विवेकानंद स्मारक समितीचे सर्व सदस्य तसेच स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय महामार्गावर उभे राहिलेले हे भव्य स्वामी विवेकानंद स्मारक युवकांना चारित्र्य, आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा व सेवा भावनेची प्रेरणा देणारे विदर्भातील एक महत्त्वाचे प्रेरणास्थान ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0