नवी दिल्ली,
virat-viral-video भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली असून, मालिकेतील पहिला सामना वडोदऱ्यात पार पडला. हा सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला जबरदस्त फॉर्म सिद्ध केला. त्यांनी 93 धावा केल्या; मात्र, त्याचे शतक फक्त 7 धावांनी हुकले. विराटच्या या दमदार खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला आणि सामन्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मालिकेतील दुसरा वनडे सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे, ज्यात टीम इंडियाला विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे.

दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात फलंदाजीला जाण्यापूर्वी त्याची तयारी कशी होते, हे दिसत आहे. या व्हिडीओनुसार, विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये बसून फलंदाजीसाठी स्वतःला तयार करताना दिसतो. त्यामध्ये काही खास सवयी दिसून येतात. विराट फलंदाजीला जाण्यापूर्वी सर्वप्रथम शरीरावर परफ्यूम स्प्रे करतो, त्यानंतर दोन्ही हातांवर क्रिम लावतो आणि लगेच काही खाऊन मैदानात उतरतो. virat-viral-video हा व्हिडीओ फक्त एका सामन्यापूर्वीचा असल्यामुळे ही त्याची नियमित सवय आहे की नाही, हे निश्चित सांगता येत नाही; मात्र अनेक क्रीडाप्रेमी याला त्याची रोजची तयारी मानत आहेत. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28 हजार धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते आता फक्त वनडे मालिकांमध्ये खेळत आहेत. आगामी वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचे संघ तयारीत आहेत. विराटचा हा फॉर्म कायम राहिला, तर त्याचं वनडे संघातील स्थान वर्ल्डकपपर्यंत ठाम राहणार आहे.
सौजन्य : सोशल मीडिया