प्रत्येक गरजूला घरकुल : पालकमंत्री डॉ. भोयर

14 Jan 2026 20:21:36
सुकळी स्टेशन येथे पट्टेवाटप
 
वर्धा : 
प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या घराचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने समाजातील प्रत्येक गरजू कुटूंबाना घरकुल उपलब्ध करुन देण्यासोबतच अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करीत असलेल्या जागेचे अतिक्रमण नियमानुकुल करुन पट्टे देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
 
 
Bhoyar
 
सेलू तालुयातील सुकळी स्टेशन येथे अतिक्रमण नियमानुकुल झालेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटपा कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, तहसिलदार डॉ. शकुंतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, सुकळीच्या सरपंच निलम जाधव, उपसरपंच प्रमोद तडस, लाभार्थी कौशल्या थुल आदी उपस्थित होते.
 
 
ना. Dr. Pankaj Bhoyar डॉ. भोयर पुढे म्हणाले की, पट्टे वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज केल्यास त्यांना घरकुल मंजूर करण्यात येईल. देशाची संस्कृती ज्या सणातून प्रतिबिंबीत होते अशा मकरसंक्रातदिनी लाभार्थ्यांना हक्काची जागा उपलब्ध झाली ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. सेलू येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या तहसील व कृषी कार्यालयातून विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी जागृत राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे ना. डॉ. भोयर म्हणाले.
 
 
गेल्या ४४ वर्षांपासून अतिक्रमीत असलेल्या जागेचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे आता गावकर्‍यांना हक्काची जागा मिळाली असल्याचे सरपंच निलम जाधव म्हणाल्या. सुकळी स्टेशन येथे ३३ लाभार्थी अतिक्रमीत जागेवर ३० ते ३५ वर्षांपासून वास्तव्य करीत होते. या ३३ लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करुन त्यांना पट्टे मंजूर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar  डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते सर्व २१ लाभार्थ्यांना शासकीय जमिनीच्या पट्टयांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी केलेे. संचालन साटोणे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0