शिवसेनेचा भाजपच्या नगराध्यक्षांना बिनशर्त पाठींबा
भंडारा: Bhandara Municipal Council Election भंडारा नगर परिषदेत महायुतीतील तीनही घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक अशा प्रचंड मोठा विजयासह भाजपने सत्ता स्थापन केली. शिवसेनेचे 5 नगरसेवक निवडून आले. आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांना पुढील पाच वर्षासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे केला आहे. पाठिंब्याचे पत्र शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते राजेश धुर्वे यांनी नगराध्यक्ष मदनगर यांना दिले. त्यामुळे आधी एकमेकांविरोधात लढून, आता एकत्र आले असेच चित्र येथे तयार झाले.
Bhandara Municipal Council Election भंडारा नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनेकांसाठी प्रतिष्ठेची ठरली. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सौभाग्यवती अश्विनी भोंडेकर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. भाजपाकडून माजी नगरसेविका मधुरा मदनकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी होती. संपूर्ण निवडणूक काळात शिवसेना आणि भाजपा असा संघर्ष पाहायला मिळाला. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या मधुरा मदनकर नगराध्यक्ष झाल्या. शिवसेनेचे 35 पैकी पाच नगरसेवक निवडून आले. शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना आज शिवसेनेचे गटनेते राजेश धुर्वे यांनी नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांना पुढील पाच वर्षासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे पत्र सोपविले. कुठल्याही पदाची पेक्षा न करता विकास कामांसाठी पाच वर्ष नगराध्यक्षांच्या पाठीशी राहून, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शहरात सुरू केलेली विविध विकास कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होण्याची अपेक्षा यात व्यक्त केली आहे. राज्यात महायुती असल्याने स्थानिक पातळीवरही ती कायम असावी, असे पत्रात नमूद आहे. शिवसेनेचा हा पाठिंबा म्हणजे, झाले गेले विसरून जावे अन पुढे पुढे चालावे, असाच म्हणावा लागेल. निवडणुकीतील प्रचंड आरोग्य प्रत्यारोपानंतर भाजपहे नेते याकडे कसे पाहतात, हे पाहणे योग्य ठरेल.