वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कारवाई
कारंजा (घा.) :
शेतीच्या सात बार्यावर पीक पत्रक चढवण्यासाठी शेतकर्याला Bribery लाचेची मागणी करणारा तलाठी ललितकुमार जोगे (४०) याला वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई आज १४ रोजी तालुयातील ग्रामपंचायत काजळी येथे करण्यात आली. लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय शेतकर्याचे डोंगरगाव शेतशिवारात शेती आहे. या शेताचे सन २०२४—२०२५ चे पीक पत्रक (पेरापत्रक) सात-बारा उतार्यावर चढविण्यासाठी तक्रारदाराने तलाठ्याशी संपर्क साधला होता.
तलाठी जोगे याने सातबार्यावर पीक पेरा चढवण्याकरिता ३ हजार रुपयांची मागणी केली. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी Bribery लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज १४ रोजी दोन पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान तलाठ्याने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तलाठी जोरे याच्या घराची झडती सुरू आहे. कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. राकेश साखरकर यांनी केली.