नवी दिल्ली,
Fire at Ravi Shankar Prasad's bungalow दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागल्याची घटना घडली. मदर टेरेसा क्रेसेंट रोडवरील बंगला क्रमांक २१ येथे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला सकाळी सुमारे ८ वाजून ५ मिनिटांनी मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई करत आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात, बंगल्यातील एका खोलीत असलेल्या बेडला आग लागल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला फोन बंगला क्रमांक २ वरून आल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तपासाअंती ही घटना प्रत्यक्षात रविशंकर प्रसाद यांच्या मालकीच्या बंगला क्रमांक २१ मध्येच घडल्याचे स्पष्ट झाले. आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून याबाबत सखोल तपास सुरू आहे.