मंगरूळनाथ :
कासोळा येथील श्री मो. चं. ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा एलिमेंट्री व इंटरमिजिएट 'Grade Drawing Examination 2025-26' ग्रेड चित्रकला परीक्षेचा २०२५- २६ चा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयातील एकूण २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी सर्वच विद्यार्थी चांगला ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले असून संस्थेचे अध्यक्ष सुभाष ठाकरे व सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेत प्राची वाघमारे, नेहा बडवे, प्रियल तायडे यांनी अ श्रेणी मिळविली तर संचिता बडवे, राणू भोयर, राजवी भगत, कल्याणी उंदरे, श्रावणी चव्हाण, गायत्री गेंड, श्रद्धा भोयर, अक्षरा गेंड या विद्यार्थ्यांनी ब श्रेणी मिळविली. गायत्री तागडे हिला क श्रेणी मिळाली.
'Grade Drawing Examination 2025-26' तसेच इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत कृष्णा भोयर, महेश वाणी, सागर लोंढे, सार्थक घोडके, ऋतुजा ठाकरे, ऋतुजा गोंडकर या सहा विद्यार्थ्यांनी अ श्रेणी मिळविली तर कृष्णा लोंढे, कुलदीप ठाकरे, कुणाल चौधरी, यश भोयर, गीता लाडके, खुशिता कदम या सहा विद्यार्थ्यांनी ब श्रेणी मिळविली, गजानन ठाकरे, केतन पाठे, श्रावणी ठाकरे, वैष्णवी गावंडे या चार विद्यार्थ्यांना क श्रेणी मिळाली. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे तायडे व इतर सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.