वर्धा :
Injhapur Garbage Depot शहरातून जमा करण्यात आलेला कचरा नगर पालिका प्रशासन इंझापूर येथील कचरा डेपोत साठवते. याच ठिकाणी कचर्यापासून खत निर्मिती केली जाते. याच कचरा डेपोतील कचर्याला आग लागली. अग्निशम विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवळपास ४ तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. ही घटना १३ रोजी रात्री उशीरा घडली.
Injhapur Garbage Depot मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांतून जमा केलेला कचरा इंझापूर येथील डम्पींग यार्ड येथे साठविला जातो. इंझापूर येथील कचरा डेपोत आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह इंझापूर येथील डम्पींग यार्ड गाठले. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून सुमारे ४ तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या आगीत मोठ्या प्रमाणात कचरा जळाल्याने परिसरात धूर पसरला होता. बोरगाव मेघे ग्रामपंचाय क्षेत्रात येणार्या लोकवस्तीत पहाटेही धूर पसरलेला होता. शहरातील घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांतून गोळा केलेला कचरा इंझापूर येथील डम्पींग यार्ड येथे साठविला जात आहे. पण तेथील कचर्यापासून खत निर्मितीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून बंद आहे.