नागपूर,
Logo unveiling राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या ५३ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीच्या अधिकृत लोगोचे अनावरण बुधवार, दिनांक १४ जानेवारी रोजी शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर, नागपूर येथे थाटात पार पडले.

दिनांक २८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या भव्य प्रदर्शनीच्या पार्श्वभूमीवर आयोजित Logo unveiling लोगो अनावरण समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक मा. डॉ. राजकुमार अवसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत काळमेघ होते. यावेळी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या विभागप्रमुख डॉ. हेमलता बांबल, एस.आय.सी. नागपूरचे जयेश वाकोडकर, राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे समन्वयक डॉ. जे. के. केचे तसेच सरीता मंगेश यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
Logo unveiling यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या प्रदर्शनीचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नवोन्मेषी विचारांना प्रोत्साहन देणे तसेच विज्ञान शिक्षण अधिक परिणामकारक बनवणे हा या प्रदर्शनीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील बालवैज्ञानिकांसाठी ही प्रदर्शनी प्रेरणादायी ठरेल आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येत शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.