मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाखो लोकांनी केले स्थान!

14 Jan 2026 10:25:38
वाराणसी,
Makar Sankranti bath मकर संक्रांतीच्या दिवशी हरिद्वारमध्ये भाविकांचा श्रद्धेचा उत्साह दिसून आला. कड्याक्याची थंडी, दाट धुके आणि थंड वारा असला तरीही हजारो भाविकांनी ब्रह्म मुहूर्तावर हरी की पौडीसह गंगेच्या पवित्र काठावर स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. हरी की पौडी परिसरात गर्दी सर्वाधिक होती, तर सुभाष घाट, गौ घाटासह इतर प्रमुख घाटांवरही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. डोंगराळ भागातून पारंपारिक देव डोलीही हरिद्वारमध्ये दाखल झाल्या. ढोल-शंखांच्या गजरासह देव डोली हरी की पौडीवर पोहोचल्या आणि "हर हर गंगे" व "जय माँ गंगे" अशा जयघोषांनी घाट परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाहून निघाला.
 
 

 Makar Sankranti 
भाविकांनी गंगेत स्नान करण्यासोबतच खिचडी, तीळ, गूळ आणि लोकरीचे कपडे दान करून धार्मिक कार्य पार पाडले. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हरिद्वारमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले, तर अन्य ठिकाणीही, जसे कि आदि बद्रीनाथ धाम, भगवान नारायण अभय मुद्रेत विराजमान झाले होते.
Powered By Sangraha 9.0