जय महाकालीत नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार

14 Jan 2026 20:07:46
शहर स्वच्छतेसाठी १ लाख पुरस्कार
 
वर्धा :
जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा वाढदिवसानिमित्त Makar Sankranti get-together program मकरसंक्राती स्नेहमिलन कार्यक्रमात आज १४ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जय महाकालीचे सचिव सचिन अग्निहोत्री यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.
 
 
makar
 
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले वर्धा शहर महात्मा गांधींच्या तत्त्वांचे मंदिर, शिक्षणाचे केंद्र आणि ग्रामीण विकासाचे प्रतीक असुन ते आपल्या हृदयात आहे. आपण वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. हे फत शब्द नसुन कृतीचे वचन आहे. वर्धा शहराच्या विकासासाठी आम्ही रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छता यावर तात्काळ काम सुरू करणार आहोत. तसेच पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहणार्‍या भागांना शुद्ध स्वच्छ पाणी, दरवर्षी १०० टक्के प्लास्टिकमुक्त वर्धा निर्माण करू तसेच हरित उद्यान आणि पर्यटन स्थळे विकसित करून रोजगार निर्मिती करू असे ते म्हणाले.
 
 
Makar Sankranti get-together program पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पक्षीय मतभेद विसरून एकजुटीने कार्य करून गांधी, विनोबांची भूमी असलेल्या वर्धेचा चेहरा मोहरा बदलवावा व शहराचा सर्वांगिण विकास करावा असे आवाहन केले. यावेळी पं. अग्निहोत्री यांनी शहरात सर्वांगिण विकास साध्य करणार्‍या नगसेवकाला वर्धा भूषण पुरस्कार आणि १ लाख रुपये रोख देण्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला तसेच वर्धा शहराच्या विकासा बाबत चित्रफित दाखविण्यात आली व त्यामध्ये कोणकोणत्या भागात विकासाची गरज आहे हे दाखविण्यात आले. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मनोगत व्यत करत वर्धेचा विकासासाठी जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केली तर संचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी केले. कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0