लहान मुलींच्या आरोग्यासाठी विशेष आयुर्वेदिक शिबिर

14 Jan 2026 16:59:06
नागपूर,
Datta Meghe Ayurveda College दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयोगाने ग्रामीण भागात लहान मुलींच्या आरोग्य संवर्धन व उंची वाढीसाठी विशेष आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. शिबिरात प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संतोष पुसदकर यांनी लहान मुलींची सखोल तपासणी करून आजारानुसार आहार-विहार, दिनचर्या तसेच औषधोपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 
 
Datta Meghe Ayurveda College
 
या उपक्रमात आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदणी, आरोग्य तपासणी व रुग्णसेवेत सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच डॉ. साकिब, डॉ. सिद्धी भागवत, डॉ. सिद्धी केला, डॉ. शिरसाट व सरफराज यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. Datta Meghe Ayurveda College ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचारांची उपयुक्तता वाढवणे तसेच आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0