योग नृत्य परिवारतर्फे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन

14 Jan 2026 14:38:51
नागपूर,
Voter awareness rally योग नृत्य परिवार, चिटणीसनगर तर्फे प्रभाग २८ मध्ये मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये अंदाजे १०० ते १२५ महिला व पुरुषांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात चिटणीस नगर बगीच्यात फलक व बॅनर घेऊन करण्यात आली, जिथे नितीन बर्गे आणि मोरेश्वर दुरुगकर यांनी मतदान, लोकशाही आणि संविधान मूल्यांचा प्रचार नाट्यमय पद्धतीने केला.
 
Voter awareness rally
 
उपस्थित जनसमुदायाला परमेश्वर राऊत यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि नागरिकांनी सजग राहून लोकशाही समृद्ध करण्याचे आवाहन केले. Voter awareness rally रॅली दिघोरी परिसरातील प्रगती मैदान, रमणा मारोती मार्ग आणि ईश्वरनगर चौक येथे गेली, जिथे पंथ नाट्याच्या स्वरूपात मतदान प्रक्रिया आणि निवडणुकीची माहिती जनतेला दिली गेली.
 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योग नृत्य परिवारातील अनेक सदस्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, ज्यात शरद वानखेडे, महेश बानते, गिरीश निमकर, सागर राऊत, रोशन गोतमारे, मनोज दलाल, Voter awareness rally आतिलकर शंकर मौर्य, मनोज कुंभारे, दिलीप कोचे, सचिन तिडके, गजानन कांबळे, सौरभ राऊत, सुशांत राऊत, राकेश सदोकर, तीरथ ढोक, तसेच महिला सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
सौजन्य: परमेश्वर राऊत, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0