वॉशिंग्टन,
war-between-iran-and-us इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता पारंपरिक युद्धाचे स्वरूप न घेता वेगळ्याच दिशेने वळण घेतले आहे. क्षेपणास्त्रे, रणगाडे किंवा रणांगणावरचे सैनिक नाहीत, तर मानसिक दबाव, अफवा आणि माहितीच्या आधारे लढले जाणारे युद्ध सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. अमेरिका थेट लष्करी हस्तक्षेप न करता इराणमधील सत्तास्थापनेला हादरवण्याचा प्रयत्न करत असून, या तथाकथित ‘मानसिक युद्धा’चे नेतृत्व स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असल्याचे दिसते.
अमेरिकेच्या प्रसिद्ध वृत्तपत्रने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन इराणविरोधात मानसिक युद्धाची रणनीती आखत आहे. war-between-iran-and-us ब्रिटानिका या ज्ञानकोशानुसार, मानसिक युद्ध ही आधुनिक संघर्षपद्धती असून त्यात शत्रू देशाच्या जनतेचे आणि सैन्याचे मनोबल खच्ची करणे, भीती निर्माण करणे आणि सत्तेविरोधात असंतोष वाढवणे यावर भर दिला जातो. अशा युद्धासाठी अमेरिकेकडे स्वतंत्र आणि विशेष प्रशिक्षित यंत्रणा असल्याचेही नमूद केले जाते.
इतिहास पाहिला तर मानसिक युद्धाची उदाहरणे प्राचीन काळापासून आढळतात. war-between-iran-and-us बाबिलोनविरोधातील संघर्षांपासून ते चंगेज खानच्या मोहिमांपर्यंत या पद्धतीचा वापर झाल्याचे सांगितले जाते. भीती पसरवणे, दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे आणि शत्रू सैन्याचे मनोबल ढासळवणे – या तीन प्रमुख घटकांवर मानसिक युद्ध उभे असते.
सध्या इराणविरोधात याच पद्धतींचा वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. war-between-iran-and-us १४ जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात इराणी जनतेला आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. “लढा सुरू ठेवा, अमेरिकेची मदत लवकरच पोहोचेल,” असे त्यांनी म्हटले; मात्र ही मदत नेमकी कशा स्वरूपाची असेल, याचा खुलासा करण्यात आला नाही. या विधानामुळे इराणमधील सत्ताधाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
अमेरिकेचा उद्देश असा आहे की इराणी सरकारने घाईघाईत एखादी मोठी चूक करावी आणि त्यामुळे देशांतर्गत अस्थिरता वाढावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इराणचे माजी युवराज रेझा पहलवी यांनीही निवेदन जारी करत लष्करी अधिकाऱ्यांना सरकारविरोधात उभे राहण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.
दुसरीकडे, अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे आरोप होत आहेत. पाश्चात्य माध्यमांमध्ये इराणमधील आंदोलनांबाबत अतिरंजित आणि अप्रमाणित आकडेवारी दिली जात असून, सोशल मीडियावर जुने किंवा बनावट व्हिडिओ फिरवले जात असल्याचेही समोर येत आहे. कोणत्याही अधिकृत आकडेवारीशिवाय हजारो मृत्यू झाल्याचे दावे केले जात असून, यामुळे गोंधळ वाढत आहे.
या सगळ्या घटनांसाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना जबाबदार धरले जात असले, तरी इराणच्या सध्याच्या राजकीय रचनेत आर्थिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या राष्ट्रपतींकडे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. २०२४ मध्ये इराणी जनतेने सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान यांना सत्तेत आणले होते, हा मुद्दाही चर्चेत आहे.
याशिवाय, अमेरिकेने इराणी क्रांतिकारी रक्षक दलाचे (आयआरजीसी) मनोबल खच्ची करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जाते. ‘टेलिग्राफ यूके’च्या वृत्तानुसार, अमेरिकेने ब्रिटनकडे आयआरजीसीला तात्काळ दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे इराण-अमेरिका संघर्ष अधिक गुंतागुंतीचा आणि धोकादायक वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.