नागपूर,
Maharashtra शासनाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये दिनांक १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. वैशाली मालोदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. Maharashtra या कार्यक्रमाला डॉ. आसकर, डॉ. मेघे, डॉ. भावना कळसुळे, डॉ. पद्मिनी दुरुडकर, डॉ. प्रणाली म्हात्रे, प्रतिवा मिश्रा, डॉ. गायत्री जोशी, डॉ. सीमा बेहरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. प्रणाली म्हात्रे, संपर्क मित्र