परिवर्तन शेतकरी संघटनेचे कृषी मंत्र्यांना निवेदन
मानोरा,
'Parivartan Shetkari Sanghatan' मंगरूळनाथ तालुयातील शेतकर्याला तालुका कृषी अधिकारी यांनी यांना अनाकलनीय कारणाने केलेली जोड्याने मारहाण मानोरा तालुयातील शेतकर्यांच्या जिव्हारी लागली असून, या मग्रूर अधिकार्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तालुका प्रशासनाच्या मार्फत राज्याचे कृषिमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मातीतून पिकणार्या अन्नावर जगाची भूक भागते, त्याच मातीचा पुत्र आज सरकारी अधिकार्याच्या बुटाखाली तुडवला जात आहे. मंगरूळनाथ तालुयातील (गोगरी) येथे १३ जानेवारी रोजी घडलेली घटना केवळ एका शेतकर्याला झालेली मारहाण नाही तर ती लोकशाहीतील अन्नदात्या’च्या अस्मितेवर झालेला अमानवीय हल्ला आहे. आपल्याच घामाचे दाम मागायला गेलेल्या ऋषिकेश पवार या तरुण शेतकर्याला तालुका कृषी अधिकारी (मंगरूळनाथ) यांनी ज्या पद्धतीने बुटाने मारहाण केली ते पाहून माणुसकीलाही लाज वाटली असेल.
मनरेगाच्या फळबाग लागवडीचे अनुदान आणि हक्काची मजुरी अनेक महिन्यांपासून रखडली होती. जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्याला कायद्याचा धाक दाखवला जातो.पण जेव्हा तोच शेतकरी पुराव्यासाठी व्हिडिओ काढतो, तेव्हा एका जबाबदार अधिकार्याचा संयम सुटतो आणि तो आपल्या पायातील बूट काढून शेतकर्यावर उगारतो, मारतो हे कोणते प्रशासन आहे? ही कोणती कार्यपद्धती आहे ? असे कृषिमंत्र्यांना 'Parivartan Shetkari Sanghatan' परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड, विशाल ठाकरे, भाऊराव चव्हाण, वसंत राठोड, सूचित देशमुख, सुभाष राठोड, संतोष राठोड, केशव राठोड, सचिन चव्हाण आदींनी निवेदन दिले आहे.
'Parivartan Shetkari Sanghatan' राज्याचे कृषिमंत्री आणि वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्यासाठी ही घटना म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. तुम्ही संवेदनशील आहात, आक्रमक आहात आणि सामान्य शेतकर्याच्या पोटी जन्मलेले नेते आहात. म्हणून आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत जर अशा अधिकार्याचे तात्काळ निलंबन करून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या घटनेत दोषीला कडक शिक्षा झाली नाही, तर हा अन्याय सहन करणारा बळीराजा उद्या सत्ताधार्यांना सत्तेपासून खाली खेचून आणू शकतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.