पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान

14 Jan 2026 12:38:17
नागपूर,
Porwal Junior College कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल होते, तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्राध्यापक प्रा. व्ही. बी. वंजारी यांची होती.
 
dr
 
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. Porwal Junior College परीक्षांमधील गैरप्रकार टाळून प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच परीक्षा केंद्रांवर लागू असलेल्या कठोर नियमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रा. विश्वनाथ वंजारी यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे, परीक्षेदरम्यान तणावमुक्त राहण्याचे व पालकांच्या अपेक्षांचे दडपण न घेता प्रामाणिक प्रयत्नातून यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. पलाश कुबडे यांनी केले.
सौजन्य: प्रा.डॉ.सुधीर अग्रवाल,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0