सरकार विरोधात प्रहारचे कटपुतली आंदोलन

14 Jan 2026 21:33:47
तहसील कार्यालयाला घातला घेराव
 
चांदूरबाजार, 
Prahaar : katputali Andolan अतिवृष्टी, नापिकी व सरसकट कर्जमाफी सारख्या शेतकर्‍याच्या रास्त मागणीसाठी प्रहार जन पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयाला घेराव घालून , प्रशासन विरोधात कटपुतली आंदोलन बुधवारी करण्यात आले. नापिकी, अतिवृष्टी, वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा अत्यंत अल्प भाव, यामुळे शेतकरी देशोधडीला लागून कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकर्‍यांच्या समस्याला वाचा फोडण्याकरिता प्रहारच्या वतीने तहसील कार्यालयावर कटपुतली आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात प्रशासनकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या मांडल्या.
 

andolan 
 
Prahaar : katputali Andolan प्रहार कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यासमोर शेतकर्‍याच्या समस्या व मागण्याचा पाढा वाचून दाखवला. त्या मागण्यामध्ये केवायसी करूनही अतिवृष्टीची मदत शेतकर्‍यांच्या खात्यात तात्काळ जमा होत नाही. शेतीचे नुकसान होऊनही पीक विमाचे पैसे शेतकर्‍यांच्या लवकर मिळत नाही. तूर व हरभर्‍याची शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकर्‍याचा शेतीमलालाची लूट होत आहे. कृषीपंपांना रात्री वीज देण्याच्या निर्णयालाही तीव्र विरोध करण्यात आला. संजय गांधी व श्रवणबाळ योजनांचे अनुदान केवायसी करूनही मिळत नसल्याचा रोष व्यक्त झाला. ५० टक्के ग्रामपंचायत करमाफीमुळे गावांचा विकास ठप्प होत असल्याने शासनाने होणारा महसूल तोटा भरून काढावा, या रास्त मागण्या तहसीलदार यांच्याकडे मांडून निवेदन देण्यात आले. सदर मागण्या तातडीने मान्य करा. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सदर अदोलनात प्रहराचे संतोष कीटूकले, प्रदीप बंड, मंगेश देशमुख व असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0