आ. बकाने यांच्या पाठपुराव्याला यश
देवळी :
देवळी—पुलगाव मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे पुलांचा प्रश्न Rajesh Bakane आ. राजेश बकाने यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ६ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मतदार संघातील दळणवळणाचा अडथळा दूर होणार आहे.
देवळी तालुयातील खर्डा—वाबगाव रस्ता कि.मी. ३/५०० येथे लघुपुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० हजार, हिंगणघाट तालुयातील मोझरी पोटी येथे पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ६० हजार, वर्धा तालुयातील करंजी (काजी) पुजाई — भानखेडा येथे लघुपुलाच्या बांधकामासाठी ९० लाख रुपये असे ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात नदी-नाल्यांना येणार्या पुरामुळे तसेच दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास, रुग्णांची ने-आण आणि ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी पूल अत्यंत आवश्यक होते. या पुलांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आमदार राजेश बकाने यांनी पदभार स्वीकारल्यापासून मतदारसंघातील रस्ते, पूल व मूलभूत पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देत शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या तिन्ही पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मतदार संघातील प्रत्येक गाव व वाडी-वस्ती सुरक्षित आणि सुकर दळणवळणाने जोडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे Rajesh Bakane आ. बकाने यांनी सांगितले.