आर्वी :
rashtrasevika-samiti-arvi वं. मावशी केळकर यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त राष्ट्रसेविका समिती आर्वीच्या वतीने प्रथमच शहरात पथसंचलन काढण्यात आले. शहरातील मुख्य मार्गाने संपुर्ण गणवेशात घोषपथकासह अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या पथसंचालनाचे शहरात ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. स्थानिक श्रीराम शाळा प्रांगण, कसबा येथून पथसंचलनाला सुरुवात होऊन ते शालिग्राम शाळा प्रांगण, स्टेशन वार्ड येथे पोहोचत समारोप झाला. पथसंचलनात ५५ गणवेश सेविका व मंगल वेशधारीत होत्या.
rashtrasevika-samiti-arvi साधना पेंडके यांच्या मार्गदर्शनात श्रीराम शाळा येथे पथसंचलनाची शाखा घेण्यात आली. प्रार्थना आणि सांघिक गीत ज्योती कुलकर्णी, वंदे मातरम् शिवानी देशपांडे यांनी सादर केले. कार्यक्रमाला जोत्सना गिरधर, अॅड. अरुणा देशपांडे व कविता जोशी यांनी मार्गदर्शन केले. पथसंचलनाला आर्वीच्या नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, तालुका संघचालक रमेश नागोसे, जिल्हा कार्यवाहिका अनुराधा भोकरे, जिल्हा सहकार्यवाहिका कल्पना मशानकर, जिल्हा संपर्क प्रमुख उज्वला केळकर, शारीरिक प्रमुख सुप्रिया अभ्यंकर, अर्पणा झाडे यांचे सह संघ पदाधिकारी, रामनवमी शोभायात्रा समितीने सहकार्य केले. आभार अर्चना देशपांडे यांनी मानले.