सामूहिक सूर्यनमस्कारातून महापुरुषांना आदरांजली !

14 Jan 2026 13:05:36
नागपूर,
Shripad Krishna Kolhatkar College श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. शारीरिक शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण डाबरे, प्रा. निलेश निंबाळकर व प्रा. गोपाल वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
sk
 
 
या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सामूहिक सूर्यनमस्कार सादर केले. मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांचे शौर्य व संस्कार, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार तसेच आरोग्याच्या दृष्टीने सूर्यनमस्काराचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. Shripad Krishna Kolhatkar College उद्घाटक अनिल जयस्वाल यांनी महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले, तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद करून आदर्श जीवनात उतरवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. निलेश निंबाळकर यांनी केली, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण डाबरे यांनी केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ३६० विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारात सहभाग घेतला.
सौजन्य:संतोष काटोरे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0