प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात भोगी उत्सव साजरा

14 Jan 2026 17:47:05
नागपूर,
Shri Shiva temple बेलिशॉप रेल्वे कॉलनीतील प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात प्राचीन शिव मंदिर व दक्षिण भारतीय (तेलगू) समाजाच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. पोंगल उत्सवापूर्वी भोगी पेटवून उत्सवाची सुरुवात करण्यात येते. मकर संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायण सुरू होते.
 
nagpur
 
मंदिर परिसरात सकाळी ५ वाजता दक्षिण भारतीय समाजातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात भोगीची पूजा करून भोगी पेटवण्यात आली. Shri Shiva temple उपस्थित सर्व भाविकांनी भजन गात भोगीची प्रदक्षिणा केली व सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता मंदिरात आरती व प्रसाद वितरणाने करण्यात आली. यावेळी प्रकाश (गुंडुराव) लक्ष्मण मूर्ती, बी. सुधाकर, पी. शेषू रेड्डी, बालाजी, एस. नारायण मूर्ती, प्रसाद , जी. व्ही. राव, कृष्णा राव, व्ही. एस. एन. मूर्ती, मनीष नायडू, सुरेश पटनायक, राम बाबू, एन. लक्ष्मण नायडू, टी. शारदा, बी. पार्वती, एस. पद्मा, बी. अन्नपूर्णा, सरस्वती, अरुणा, कविता, पी. कन्याकुमारी, एम. लक्ष्मी, पी. उषा आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0