दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

14 Jan 2026 17:43:06
मानोरा, 
शहरातील मुख्य मार्गावरील दुकानासमोरील Two-Wheeler-Thief दुचाकी भर दुपारी उडविणारा व चौर्य कर्म करताना लोज सर्किट कॅमेर्‍यात कैद झालेल्या चोराचे चित्रफीत संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस प्रशासनाने आपले चक्रे फिरवून सदरील चोराला कारंजा येथील आपल्या घरातून चोरी केलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
 
 
chor
 
Two-Wheeler-Thief स्थानिक राठी नगरातील अरविंद कुमार विद्यासागर मिश्रा यांची एमएच ३७ वाय ही एचएफ डीलस हिरो कंपनीची दुचाकी शहरातील मुख्य मार्गावरील गजबजलेल्या ठिकाणावरून भर दुपारी चोरी गेल्याची तक्रार दुचाकी मालकाने स्थानिक पोलिस प्रशासनाकडे केली होती. ही दुचाकी चोरी झाल्याची बाब महामार्गावरील एका व्यापारी प्रतिष्ठानच्या लोज सर्किट कॅमेरा मध्ये (सीसीटीव्ही) कैद होऊन ती मानोरा शहर व तालुयासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायरल होऊन या चोरीची चर्चा दुचाकी बाळगणार्‍या प्रत्येक नागरिकांमध्ये झाली होती. दुचाकी मालकाची तक्रार व व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज यामुळे सतर्क झालेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी आणि स्थानिक ठाणेदार नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राम सरोदे, पोलिस हवालदार मदन पुणेवार, पोलिस शिपाई फिरोज खान, गोकुळ पांडुळे ,रोहन तायडे यांनी दारव्हा वेस कारंजा येथून दुचाकी चोर बुर्‍हाण शहा भूरु शहा यास चोरी केलेल्या दुचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.
Powered By Sangraha 9.0