४६९ उमेदवारांचे भाग्य आज होणार 'ईव्हीएम' बंद

14 Jan 2026 21:38:28
मनपा निवडणूक:५ लाख ५० हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क:मतदान पथके रवाना

अकोला :
Voting for Akola Municipal Corporation तीन वर्षांपासून कार्यकाळ संपलेल्या अकोला महापालिकेसाठी गुरुवार,१५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० या वेळेत शहरातील ६३० मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.बहुसदस्यीय प्रभाग असणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत २० प्रभागातून ८० नगरसेवकांच्या जागा आहेत.या निवडणुकीत ४६९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्वांचे भाग्य आज ईव्हीएम बंद होणार आहे.दरम्यान शुक्रवार, १६ रोजी सकाळी १० वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
 

matadan room
 
सन २०१७ साली अकोला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. सन २०२२ मध्ये कार्यकाळ संपला.तीन वर्षांपासून प्रशासक राज होते.दरम्यान १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.आठ वर्षांपासून निवडणूक न झाल्याने या निवडणुकीत उत्साहाचे वातावरण दिसून आले.गेल्या निवडणुकीत भाजपने ४८ जागी विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली होती.यंदा भाजप राष्ट्रवादीची युती आहे.
 
तर शिवसेना ६१ जागी भाग्य आजमावत आहे.
Voting for Akola Municipal Corporation दुसरीकडे काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित, प्रहार व मनसेने सुध्दा प्रचारात आघाडी घेतली आहे.गत दहा दिवसापासून शहरात सभा, रॅली, कॉर्नर बैठकांनी राजकिय वातावरण तापले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय राठोड, खा.असुद्दीन ओवैसी, खा.इम्रान प्रतापगडी आदींच्या सभा बैठक पार पडला.दरम्यान मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे आता औत्सुक्याचे असणार आहे.
या लढतीकडे असणार लक्ष
प्रभाग १५ अ मध्ये भाजपचे हरीश आलीमचंदानी, मनसेचे पंकज साबळे,​​प्रभाग १६ अ भाजपचे संजय बडोणे व शरद पवार गटाचे रफिक सिद्दिकी, प्रभाग १९ ड मध्ये पूजा पंकज गावंडे या भाजपच्या माधुरी बडोने, प्रभाग १२ मध्ये अजय शर्मा विरुद्ध सागर भारुका,​प्रभाग ३ ड मध्ये भाजपचे सागर शेगोकार यांना वंचित बहुजन आघाडीच्या निलेश देव यांचे तगडे आव्हान आहे. प्रभाग १७ ड मध्ये शिवसेनेचे राजेश मिश्रा, भाजपचे करण साहू आणि काँग्रेसचे आझाद खान यांच्यात तिहेरी लढत होत आहे.प्रभाग १३ ड मध्ये अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार व भाजपचे अनिल मुरूमकार,
कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर
निवडणूक क्षेत्रातील सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कंपन्या, कारखाने, दुकाने, आयटी कंपन्या, मॉल्स आणि इतर सर्व व्यापारी आस्थापनांना लागू राहील.अपवादात्मक परिस्थितीत किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे.
 
अडीच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त
महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात अडीच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.पोलिस उपअधीक्षक - ५, पोलिस निरीक्षक - १३, सहाय्यक पोलीस निरीक्षक- ८, पोलीस उपनिरीक्षक-१३९, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक-२३, पोलिस अंमलदार - १२६६
होमगार्ड - १२००, एसआरपीएफ - १ प्लाटून असणार आहे.
पक्षनीहाय उमेदवार
भाजप- ६२, शिवसेना-६१, राष्ट्रवादी-१४, शरद पवार गट-२३, उबाठा-५७, काँग्रेस-४८, वंचित-४७, एमआयएम- ३०, मनसे-८, महानगर विकास समिती-५, आम आदमी पार्टी-४, बहुजन समाज पार्टी-४, पिईपी- २, प्रहार-२, अपक्ष-१०२ असे एकूण ४६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
 
३२०० निवडणूक कर्मचारी सहभागी
महापालिका निवडणुकी दरम्यान ६३० मतदान केंद्रावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले असून ही संख्या ३ हजार २०० एवढी आहे.एका मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राधिकारी, दोन पोलीस कर्मचारी, संवेदनशील केंद्रांवर एक एसआरपीफ जवान व एक पीएसआय देखील राहणार आहे.
असे आहेत मतदार
पुरुष-२७४८७७
स्त्री - २७५१४२
तृतीयपंथी- ४१
एकूण - ५५००६०
Powered By Sangraha 9.0