दुचाकीवरून ७० हजारांची बॅग लंपास

15 Jan 2026 18:11:50
वणी, 
येथील रेल्वे सायडिंग वणी येथे कार्यरत असलेले वेकोली कर्मचारी राजेश नाना चौधरी (वय ५९, भोंगळे लेआउट) यांची हजार रुपयांची रोकड अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना मंगळवार, १३ जानेवारी रोजी संध्याकाळी घडली. राजेश चौधरी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखेतून 70,000 theft ७० हजार रुपये रोख काढले होते. या रकमेत ५०० रुपयांच्या ८० नोटा व २०० रुपयांच्या १५० नोटांचा समावेश होता. ही रोकड हँडबॅगमध्ये ठेवून ते दुचाकी क‘मांक एएफ३३६३ ने आवारी लेआउटकडे निघाले.
 
 
bag chor
 
70,000 theft  जटाशंकर चौकाजवळ पांडे मोबाईल शॉपीसमोर एका अज्ञात इसमाने त्यांना थांबवून दुचाकीवर घाण लागल्याचे सांगितले. रस्त्यावर वर्दळ असल्याने ते थांबले नाहीत. पुढे भाजीमंडी परिसरात जामनगरी दुकानाजवळ त्यांनी दुचाकी उभी करून साफसफाईसाठी खाली उतरले. यावेळी त्यांनी पैशांची बॅग दुचाकीच्या हँडलला अडकवून जवळच्या किराणा दुकानातून कागद आणण्यासाठी किराणा दुकानातून त्वरित परतल्यानंतर दुचाकीवर अडकवलेली बॅग दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही बॅग न सापडल्याने अज्ञात इसमाने ही बॅग चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राजेश चौधरी यांनी वणी पोलिस ठाण्यात तक‘ार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0