क्रीडा दिंडीतून व्यसनमुक्तीचा संदेश

15 Jan 2026 20:31:16
‘आनंदवन’चे आयोजन
वरोडा, 
आनंदवन येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त गुरूवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता महाविद्यालयाच्या मैदानावरून क्रीडादिंडी काढण्यात आली. व्यसनमुक्त समाज निर्माण करून युवकांना कुठल्याही Addiction recovery message नशेपासून दूर ठेवत खेळाकडे वळविणे यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अशी दिंडी देशात पहिल्यांदाच काढली गेली असा आयोजकांचा दावा आहे.
 
 
sandesh
 
साई वर्धा पॉवर जनरेशन प्रा. लिमिटेडचे प्रमुख जे. एस. मूर्ती, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, रवींद्र नलगटींवार, दीपक शिव, राजेश ताजणे आदी अतिथींच्या हस्ते क्रीडा दिंडीला हिरवा झेंडा दाखवून महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरून प्रारंभ झाला.
 
 
 
Addiction recovery message  दिंडीच्या समोर महाविद्यालयाचे राष्ट्रीय खेळाडू तिरंगा व मशाल घेऊन चालत होते. त्यानंतर महाविद्यालयाचे बँड पथक विविध प्रकारचे धून वाजवत होते. क्रीडा दिंडीत विविध क्रीडा साहित्य व ट्रॉफी असलेली पालखी होती. या दिंडीत 35 विविध खेळांचे प्रात्यक्षिक खेळाडूंकडून सादर केल्या जात होते, हे विशेष. याशिवाय खेळामधून चारित्र्य निर्माण व्हावे व युवा पिढी विविध व्यसनापासून दूर राहावी यासाठी विविध प्रकारची माहिती असणारे फलकही होते.
 
 
Addiction recovery message  महाविद्यालयातून निघालेली क्रीडा दिंडी आनंदवन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विनायक लेआउट मार्गे चंद्रपूर-नागपूर महामार्ग येथून महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पोहचली. येथे आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगानाने दिंडीचा समारोप झाला. महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, माधव कवीश्वर, सदाशिव ताजणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने यांनी क्रीडा दिंडीच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रा. तानाजी बायस्कर, सचिन साळुंखे, उमेश घुलक्षे, शौकत खान, प्रा. मोक्षदा मनोहर आदींचे अभिनंदन केले.
 
देशातील पहिली क्रीडा दिंडी म्हणून चर्चेत
या उपक्रमामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयासह आनंद अंध विद्यालय, आनंद माध्यमिक विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालय, संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, संस्कार भारती पब्लिक स्कूल, विवेकानंद माध्यमिक विद्यालय, एस. ए. योगा इंस्टिट्यूट, रोटरी क्लब, जिल्हा परिषद शाळा आनंदवन, फौजी कराटे ग्रुप या सर्व शाळेतील व क्रीडा क्लबमधील खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक आणि क्रीडा प्रेमी सहभागी होऊन नशामुक्तीचा संदेश दिला. क्रीडा दिंडीमध्ये भारतीय पारंपारिक क्रीडा व व्यायाम प्रकारांचे तसेच 35 विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ही देशातील पहिली क्रीडा दिंडी म्हणून चर्चेत होती.
Powered By Sangraha 9.0