चंद्रपूर,
Chandrapur Voter List चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ दरम्यान काही मतदान केंद्रांवर मतदारांनी तक्रार केली की, ऑनलाईन पाहता त्यांच्या नावाची नोंद असूनही केंद्रावरील मतदार यादीत त्यांचे नाव दिसत नाही. प्रशासनाने तक्रार केलेल्या याद्यांची तपासणी सुरू केली असून, योग्य तो बदल करून मतदारांना त्यांच्या हक्काचा वापर करता यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आहे.