देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर
नागपूर,
महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत बोटावर शाही लावायची की, मार्करने शाही लावावी, या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाकडून ठरविण्यात येतात. यापूर्वीही अनेक वेळेला मार्कर पेन वापरला आहे. तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरेंना मार्कर पेनवर विश्वास नसेल तर बोटाला ऑईल पेंट लावावा, असे सडेतोड उत्तर CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आयोगाने लक्ष दिले पाहिजेत
राज ठाकरेंना मार्कर पेनबद्दल हरकत असेल तर निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. राज ठाकरेंना पराभव दिसत असल्याने काही लोक उद्याच्या निकालाचा अंदाज लावून काही गोष्टींवर मुद्दाम भाष्य करत आहेत. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे यातून स्पष्ट दिसून येत आहेत. मार्कर वापरण्याबाबत कोणीही आक्षेप घेत असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष दिले पाहिजेत. निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी नवीन स्क्रिप्ट लिहिली पाहिजे
विरोधी पक्षाच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने झापले तरी पुन्हा पुन्हा तीच स्क्रिप्ट वापरतात. विरोधी पक्षांनी आता नवीन स्क्रिप्ट लिहिली पाहिजे. मनपा निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित असल्याने विरोधी पक्ष उद्या काय कारण सांगायची आहेत त्याची प्रॅक्टिस करत आहे. काही नेत्यांनी पॅड युनिटचे नाव पाडू युनिट केले आहे. ही मशीन काही अचानक आलेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून सांगितले होते. ही मशीन काय आहे याचा उपयोग कसा हे होते.फक्त मतमोजणीला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया आहे.यात जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. मतदान फक्त अधिकार नाही कर्तव्य सुध्दा ही आहे.
ठोकशाहीने आम्ही घाबरणार नाही
महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग ११ मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर गोरेवाडा परिसरात मध्यरात्री काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जाऊन शिंगणे यांची विचारपूस केली आणि हल्लेखोरांना कठोर इशारा दिला. लोकशाहीत निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची असा हा प्रकार आहे. मात्र कितीही हल्ले केले तरी आमचे कार्यकर्ते घाबरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला केला आहे, त्यातील कोणालाही सोडले जाणार नाही. अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील, अशा शब्दांत त्यांनी गुंडगिरी करणार्यांना इशारा दिला.
भगवा ब्रिगेड’ फक्त सिलेक्टिव्ह आहे का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भगवा ब्रिगेड’ फक्त सिलेक्टिव्ह आहे का? ही मालवणी किंवा संवेदनशील बूथवर का दिसत नाही? तिथे का जात नाही, असा सवाल CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.