ऐतिहासिक ‘दिल्ली वेश’ लोकार्पण सोहळा उत्साहात

15 Jan 2026 19:51:00
कारंजा लाड, 
कारंजा शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणार्‍या ऐतिहासिक 'Delhi Vesh' ‘दिल्ली वेश’च्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नगर परिषद, कारंजा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
 
 
Delhi Vesh
 
'Delhi Vesh'  लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार सईत प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नप उपाध्यक्ष अ‍ॅड. फिरोज शेकुवाले होते. प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, नगरसेवक जाकीर शेख, शेख महेबूब, सर्वधर्मीय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई यांची उपस्थिती होती. ‘दिल्ली वेश’ हा मार्ग अनेक वर्षांपासून शहराच्या मुख्य वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नगर परिषदेच्या पुढाकारातून या ऐतिहासिक प्रवेशद्वाराची दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.
 
 
अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. फिरोज शेकुवाले यांनी, शहराचा ऐतिहासिक वारसा जपतानाच आधुनिक विकासाला गती देण्याची भूमिका नगर परिषदेची असल्याचे नमूद केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, नगरसेवक जाकीर शेख तसेच श्याम सवाई यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ‘दिल्ली वेश’च्या जतन व सुशोभीकरणामुळे शहराच्या ऐतिहासिक ओळखीला बळ मिळाल्याचे सांगितले.
 
 
लोकार्पणानंतर 'Delhi Vesh'  ‘दिल्ली वेश’ मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगर परिषद प्रशासन, अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले. या सोहळ्यामुळे कारंजा शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0