वर्धात २० ग्रापंना सुसज्ज भवन : पालकमंत्री डॉ. भोयर यांची माहिती

15 Jan 2026 18:36:54
वर्धा, 
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रापं भवनासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आठही तालुयातील वीस ग्रापंचे भवन सुसज्ज उभे राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 
 
 Pankaj Bhoyar
 
ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकर्‍यांना नागरी सुविधा देण्याचे काम केल्या जाते. परंतु, अनेक ग्रापंच्या इमारती मोडकळीस व प्रशासनिक कामकाज करताना लहान पडत होत्या. सदर ग्रापंच्या इमारती आवश्यकतेनुसार निर्माण करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने हा निधी देण्यात आला आहे. शासनाने ८ तालुयातील २० ग्रापंच्या भवनासाठी ४.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे ही पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar डॉ भोयर यानी सांगितले.
 
 
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रापं बांधणी योजनेतंर्गत वर्धा तालुयातील सिंदी (मेघे), साटोडा, वरुड ग्रापं भवनसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सेलू तालुयातील वडगाव (जंगली), जुनगड, हिंगणघाट तालुयातील हडवस्ती, सातेफळ, समुद्रपूर तालुयातील वाघेडा, मनगाव, धामणगाव, आर्वी तालुयातील वाढोणा, आष्टी तालुयातील खंबीत, आनंदवाडी, कारंजा तालुयातील धानोली, दानापूर, देवळी तालुयातील तळणी (खा.), तांभा, पळसगांव, खातखेडा व बोरगाव आलोडा ग्रापं भवनासाठी प्रत्येकी २० लाख रुपये असे ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून या गावांमध्ये आवश्यकतेनुसार सुसज्ज ग्रापं भवन निर्माण करण्यात येणार आहे. मागील काही वर्षात राज्य शासनाने ग्रापंसाठी चांगल्या दर्जाचे सुसज्ज असे ग्रापं भवन निर्माण करण्याची योजना हाती घेतली आहे. या योजनेतून दरवर्षी ग्रापं भवन निर्माण करण्यात येत आहे. ग्रापंमधून ग्रामीण विकासाचा गाडा चालतो. अनेक ग्रापं भवन नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने ग्रापंला सुसज्ज व चांगल्या दर्जाचे भवन निर्माण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रापं भवन बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २० ग्रापंच्या भवनसाठी ४ कोटी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असे ही पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar  डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले.
Powered By Sangraha 9.0