जिल्हा नियोजनमध्ये २८१ कोटीच्या आराखड्यास मंजुरी!

15 Jan 2026 21:33:12
निधी मार्चअखेर खर्च करा : पालकमंत्री डॉ. भोयर
 
वर्धा, 
जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांना विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. विभागांनी आपल्यास्तरावर मंजूर कामे व निधीचा आढावा घेऊन मार्च अखेरपर्यंत सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश Guardian Minister Dr. Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २८१ कोटी ६६ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
 
 
bhoyar dksl
 
नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, नियोजन विभागाचे उपायुत अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार आदी उपस्थित होते.
 
 
Guardian Minister Dr. Bhoyar  सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४१२ कोटी रुपये मंजूर आहे. डिसेंबर अखेर खर्चाची टक्केवारी फारशी चांगली नाही. शिल्लक कालावधी पाहता खर्चाची गती वाढविणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. शेतकर्‍यांना नुकसानीचा चांगला मोबदला मिळण्यासाठी पंचनामे काळजीपुर्वक करावे. बोगस बियाण्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, अशा बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे कृषी विभागाने सतर्क राहून काम करावे, असे ना. डॉ. भोयर म्हणाले. सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्यात यावा. जलजीवन मिशन अंतर्गत कामं तातडीने पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या योजनांमधून पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा. जानेवारी अखेर टंचाईचा आराखडा तयार करुन फेब्रुवारी महिन्यात त्याला मान्यता देण्यात यावी. आराखड्याप्रमाणे प्रस्तावित पाणी टंचाईची कामे मार्चपर्यंत पूर्ण करावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे वेळेत पूर्ण न करणार्‍या कंत्राटदारांवर दंड आकारण्याचे निर्देश डॉ. भोयर यांनी दिले.
 
 
Guardian Minister Dr. Bhoyar  बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २८१ कोटी ६६ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २१९ कोटी ६८ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ४४ कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत १७ कोटी ९८ लाखाचा समावेश आहे.
 
 
लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विषयांवर संबंधित विभागांनी कालमर्यादेत कार्यवाही करुन लोकप्रतिनिधींना त्याबाबत अवगत करण्याच्या सूचना ना. भोयर यांनी दिल्या. यावेळी जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सुरूवातीला जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आराखड्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार यांनी विभागनिहाय सादरीकरण केले.
Powered By Sangraha 9.0