रिसोड येथील अवैध सावकारांच्या घराची झाडाझडती

15 Jan 2026 19:37:05
वाशीम, 
सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या रिसोड तालुयातील Illegal moneylender raid अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या दोन तक्रारींची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैर अर्जदार अब्दुल रऊफ शेख चांद, रा. बाल समंदर, चांदनी चौक, रिसोड आणि भगबान तुकाराम गुडधे, रा. नागझरी—गोंदाळा, ता. रिसोड यांच्या राहत्या घरी सहकार विभाग व पोलिस विभागाच्या दोन पथकांमार्फत झडतीची कार्यवाही करण्यात आली.
 
 
savkar
 
गैर अर्जदारांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी सावकारी कायद्यान्वये पुढील चौकशी सुरू आहे. ही कार्यवाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पाडण्यात आली. या कार्यवाहीमध्ये सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गजानन फाटे, सहाय्यक निबंधक (प्रशासन), अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, आर. आर. सावंत, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एम. डी. कच्छवे, सहाय्यक निबंधक आर. व्ही. आकुलवार, सहकार अधिकारी श्रेणी सिद्धार्थ पाटील, सहकार अधिकारी जे. एस. सहारे, मुख्य लिपिक पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार आर. एन. शेख, सहकार अधिकारी एस. के. खान, के. व्ही. तलवारे, सहाय्यक सहकार अधिकारी बी. ए. इंगळे, एस. बी. रोडगे, सहाय्यक अधिकारी व्ही. बी. राठोड, लिपिक आकाश बेले तसेच पोलिस विभाग व महसूल विभागातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
 
 
Illegal moneylender raid अवैध सावकारी व्यवहार करणार्‍यांवर प्रभावी नियंत्रण व कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम आणि प्रत्येक तालुयातील सावकारांचे सहाय्यक निबंधक तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अशी माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0