जागृती महिला मंचाचे स्नेहमिलन

15 Jan 2026 15:19:06
नागपूर,
Jagruti Women's Forum जागृती महिला सखी मंचातर्फे एकत्रित स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मंचातील सर्व महिलांनी एकत्र येत आपल्या लहान मुलांसाठी लुटीचा कार्यक्रम आयोजित केला.यानंतर हळदी-कुंकू व तिळगुळ समारंभ पार पडला. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत महिलांनी एकमेकींना तिळगुळ देऊन परस्पर स्नेह वृद्धिंगत केला. कार्यक्रमाच्या दरम्यान विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले असून त्यात सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या खेळांमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

achala
 
 
या सोहळ्यात परस्पर वाण देताना महिलांनी उत्साहात उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांमध्ये विविध विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली. Jagruti Women's Forum त्यामध्ये परस्पर सहकार्याने घरगुती उपयोगाची कामे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच विविध सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा व मदतीचा मार्ग शोधण्याचा संकल्प करण्यात आला.अनौपचारिक स्वरूपात पार पडलेला हा हळदी-कुंकू व स्नेहमिलनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात व परस्पर स्नेहाने संपन्न झाला.
सौजन्य:डॉ.अचला तांबोळी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0