लोकमान्य कॉन्व्हेंटमध्ये विवेकानंद जयंती साजरी

15 Jan 2026 12:51:46
नागपूर,
Lokmanya Convent लोकमान्य कॉन्व्हेंट येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली.शाळेच्या विद्यार्थिनी आराध्या गोपाले व इम्रोझ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या लहानपणातील प्रेरणादायी गोष्टी आठवणींच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना सांगितल्या.
 
deshpande
 
 
यानंतर प्राचार्या संगीता लाडखेडकर यांनी मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी सदैव प्रेरणास्थान राहिले असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो, Lokmanya Convent असे सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नोत्तरांचा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0