मंगरुळनाथ न.प. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची अविरोध निवड

15 Jan 2026 20:02:43
मंगरूळनाथ, 
Mangrulnath: Municipal Council Elections येथील नगर परिषदेत १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडीत उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे अनिल गावंडे तर स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीत भाजपतर्फे नंदलाल पवार व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा तर्फे चंदू परळीकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
 
 
naga
 
Mangrulnath: Municipal Council Elections नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नसीम परवीन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपा चे अनिल गावंडे अविरोध निवडून आले आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अपक्ष, आणि भाजपा गटातर्फे गटनेता गणेश खोडे यांनी नंदलाल खंडूजी पवार यांचे नाव दिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सलग्नित पक्षाचे गटनेता किरण परळीकर यांनी चंदू उर्फ प्रकाश परळीकर यांचे नाव दिले दोन्ही पदा करिता दोनच उमेदवार असल्याने दोघांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष अशोक परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी सतीश शेवदा, दिनेश व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत प्रथम उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यावेळी भाजप चे १० राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस १, अपक्ष ३ एमआयएम १ शिवसेना १ असे सदस्य उपस्थित होते.
 
 
निवडणुकीत उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य व यांच्या नावाची घोषणा होताच आ.श्याम खोडे व नगराध्यक्ष अशोक परळीकर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडून व ढोल ताश्यावर थिरकून आपला आनंद व्यक्त केला व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, वीरेंद्रसिंह ठाकूर, सुनील मालपाणी,शारीक सौदागर, सुधीर घोडचर, सुरेश लुंगे, अभिषेक दंडे, श्रीहरी इंगोले, संदीप हरिहर, सीराज भाई, राजू जयस्वाल, रमेशसिंह रघुवंशी, अफसर भाई, जमील कुरेशी, गणेश बजाज, संगीता भोजने, रवींद्र ठाकरे, राजकुमार गावंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0