कार्यकर्त्यांमुळे वाढला मतदानात उत्साह

15 Jan 2026 21:46:41
-दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था
 
नागपूर, 
Municipal Corporation Election महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी शांततेत पार पडली. संत्रा नगरीतील ३८ प्रभागातून सुमारे १५१ जागांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया सर्वांच्या सहकार्याने यशस्वी ठरली. मात्र या निवडणुकीत सकाळनंतर दुपारी मतदारांमध्ये निरुत्साह जाणवत होता. काही केंद्रावर तर केवळ अधिकारी आणि पोलिस कर्मचारीच होते. मतदारच येत नसल्याने थोडा निरुत्साह जाणवत होता. अशा स्थितीत सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मतदारांना केंद्रांपर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने उत्साह संचारला होता. याच सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली. अन्यथा ३० ते ३५ टक्केच मतदान झाले असते, असेही काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
 

sneh 
 
नागपुरातील विवेकानंदनगर तसेच स्नेह नगरातील संताजी महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. काही वर्षांपूर्वी मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावली जायची. यावेळी निवडणूक आयोगाने मार्कर पेनचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डाव्या तर्जनीला मार्कर पेनच्या मदतीने शाई लावण्यात आली. तसा हा निर्णय सन २०१२ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार पार पडलेल्या मनपा निवडणुकीत मार्कर पेन वापरण्यात आला होता. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यावेळी घेतलेल्या मार्कर पेनच्या निर्णयावर ज्यांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, तो विषय फ्लॉप ठरला. यासंदर्भात निवडणूक प्रक्रिया पार पडणार्‍या कर्मचार्‍यांनी मार्कर पेनचा वापर योग्य निर्णय असल्याचेही स्पष्ट केले.
टक्केवारी वाढणे काळाची गरज
Municipal Corporation Election मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. याकरिता प्रशासनासह राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जीवाचे रान केले. तरीही ५१ टक्के मतदान व्हावे ही बाब लोकशाहीसाठी योग्य नाही. याकरिता मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता काही तरी चांगले हटके उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शेवटी लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढणे काळाची गरज असल्याची भूमिका सामाजिक कार्यकर्ते आशीष दामोदर नाईक आणि संजय डबली यांनी मांडली.
Powered By Sangraha 9.0