मकरसंक्रांती निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार

15 Jan 2026 12:55:44
नागपूर,
Nari Shakti Yoga Group Vitthalnagar नारीशक्ती योगा ग्रूप, विठ्ठलनगरच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात नारीशक्ती योगा ग्रूपच्या संचालिका विद्या कपूर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मकरसंक्रांतीचे धार्मिक व शास्त्रीय महत्त्व सांगितले तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यनमस्कार का घालण्यात येतात, याविषयी योगसाधकांना मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या की मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे मकर राशीत प्रवेश होतो आणि उत्तरायणास सुरुवात होते, त्यामुळे हा दिवस योगसाधनेसाठी विशेष महत्त्वाचा आहे.

amol 
 
 
यानंतर योगसाधकांकडून सामूहिकरित्या १११ सूर्यनमस्कार घालण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी तिळगुळ वाटप करण्यात आले तसेच योगसाधकांनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले.Nari Shakti Yoga Group Vitthalnagar अशा प्रकारे नारीशक्ती योगा ग्रूपतर्फे आयोजित हा सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला.
सौजन्य:अमोल बोन्द्रे, संपर्क मित्र
                                                                         
Powered By Sangraha 9.0