नागपूर,
Nylon Manja मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. मात्र नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.
याच नायलॉन मांजामुळे आज एक पक्षी अडकून जवळपास दोन ते तीन तास हवेत लोंबकळत राहिला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच पक्षीप्रेमी सुरेश चव्हारे व प्रशांत हारगुडे यांनी तात्काळ पक्षी बचाव यंत्रणा, गोरेवाडा येथे संपर्क साधून मदतीची मागणी केली. Nylon Manjaदरम्यान, वस्तीतील नागरिक आदित्य रेहापाडे व त्यांच्या मित्रमंडळींनी प्रसंगावधान राखत स्वतः पुढाकार घेत त्या अडकलेल्या पक्ष्याची सुखरूप सुटका केली आणि त्याला जीवदान दिले.या घटनेमुळे नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी व प्राण्यांचे होणारे नुकसान पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून नागरिकांनी पर्यावरणपूरक पतंगबाजी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सौजन्य: सुरेश चव्हारे ,संपर्क मित्र