नवी दिल्ली,
People in India have diabetes आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये कॅन्सर, मधुमेह, डायबेटीज, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारखे आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. चुकीचा आहार, जंकफूडचे जास्त सेवन, तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ, तसेच बसून राहण्याची जीवनशैली या सर्व कारणांमुळे या आजारांमध्ये वाढ होत आहे. दक्षिण आशियातील लोकसंख्येत विशेषतः मुलांमध्ये लठ्ठपणा, कमी वयात मधुमेह आणि हृदयरोगाची लक्षणे दिसून येतात. भारतात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोमची स्थिती जगातील इतर देशांपेक्षा गंभीर आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात प्रत्येक १० पैकी ३ व्यक्तींना या आजारांची समस्या भोगावी लागू शकते. जर यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.
विशेष तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जंकफूडचे सेवन टाळणे, जेवणात तेल आणि साखरेचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी हेल्थ चेकअप करणे यांचा समावेश आहे. काही विशिष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, लिव्हर कॅन्सरसाठी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नखांवर काळी रेघ दिसल्यास नखांचे कॅन्सर, अचानक ताप, डोळ्यांमध्ये बदल किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास मेंदूच्या ट्यूमरचा धोका असू शकतो.
मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव आहे. व्यस्त जीवनशैली, ताणतणाव आणि मानसिक दडपण यामुळेही रक्तदाब वाढतो आणि मधुमेहाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, वाढलेले वजन या दोन्ही आजारांचे प्रमुख कारण ठरते. त्यामुळे नागरिकांनी आपली जीवनशैली सुधारावी, पोषणयुक्त आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी, अन्यथा ही आजारं वाढत चालतील आणि गंभीर आजारांचा धोका निर्माण होईल.